मुंबई – टिव्ही मालिकांमधील अभिनेत्री लीना आचार्यचे मुत्रपिंडाच्या विकाराने निधन झाले. तिचे सहकारी आणि अभिनेते रोहन मेहरा यांनी ही माहिती दिली. लीना आचार्य अवघ्या 30 वर्षांची होती. “क्लास ऑफ 2020′ आणि “सेठ जी’ सारख्या मालिकांमधून लीना आचार्यने काम केल होते.
लीना आचार्यने कधीही आपल्या आजाराबद्दल काहीही सांगितले नव्हते, कालच लीनाच्या भावाकडून आपल्याला तिच्या ती काही वर्षांपासून किडनीच्या विकाराने आजारी असल्याचे समजले, असे “परफेक्ट पती’ या मालिकेत लीना आचार्यबरोबर काम केलेले अभिनेते आयुष आनंद यांनी संगितले.
लीना आचार्य हिने “आप के आ जाने से’ आणि “मेरी हनिकारक बीवी’ या मालिकांमध्ये देखील काम केले होते.