पुणे : साडेसतरा नळी येथील एका चिकण शॉपमध्ये तरुणाचा निर्घुन खून करण्यात आला. त्याच्यावर चॉपर आणि कोयत्याने सपासप वार करण्यात आले. रक्ताच्या थारोळ्यात त्याचा पडलेला मृतदेह पाहून अनेकांचा थरकाप उडाला होता. भर दुपारी ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली होती.
आकाश लक्ष्मण भोसले (25,रा.भिमालय कॉम्पलेक्स, उत्तमनगर, हडपसर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दुकानातील कामगारास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
आकाश भोसले हा अमिर चिकण सेंटर फर्मसाठी कलेक्शनचे काम करत होता. तो अमिर चिकणची साडेसतरानळी येथील फ्रेचाईसमध्ये सोमवारी दुपारी कलेक्शनसाठी दाखल झाला होता. दरम्यान त्याच्या मागून आलेल्या दोघांनी त्याच्यावर अचानक कोयता आणि सत्तूरने वार करुन त्याचा खून केला. याची खबर हडपसर पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
नागरिकांची मोठी गर्दी परिसरात जमा झाली होती. दुकानातील कामगाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार दोन व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, संबंधीत कामगारालाही हडपसर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.