Lok Sabha Election 2024 । आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज जाहीरनामा याचा उल्लेख शपथनामा करत प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी घरगुती वापराचा गॅस, शासकीय नोकऱ्या आणि महिलांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण या संदर्भात मोठया घोषणा केल्या आहे.
दरम्यान जयंत पाटील यांनी शपथनाम्यातील आश्वासनांची माहिती दिली. त्याआधी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “मागच्या 10 वर्षात मतदारांची फसवणूक झाली. महागाई वाढली. 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी दर आता आहे. शेतकऱ्यांची दुरावस्था झाली आहे. कॉर्पोरेटसाठी पक्षपाती धोरणं राबवली. सरकारी यंत्रणाचा गैरवापर केला, तसेच मोदींनी हे केलं नाही म्हणून आह्ला करावं लागतंय अशी टीका करत राष्ट्रवादीने हा जाहीरनामा प्रकाशित केला. असे आरोप जयंत पाटील यांनी केले.
या आरोपांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात माध्यमांशी बोलतांना प्रतिउत्तर दिले आहे,’542 खासदारांमध्ये(जागांपैकी) जे 10 जागा लढवत आहेत, ते जाहीरनामा प्रकाशित करतायत. आम्ही यंव करू-त्यंव करू असं म्हणतात, त्यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का? ‘ असा खोचक सवाल फडणवीस उपस्थित केला आहे.
हे वाचले का ? घरगुती गॅस, सरकारी नोकऱ्यांबद्दल पेट्रोल अन् डिझेलच्या किंमती…’ पवार गटाच्या शपथनाम्यातून ‘मोठं’ आश्वासन