श्रीनगर : जम्मू आणि काश्मिरमध्ये झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील एक जवान शहीद झाला. तर हारवान येथे संरक्षण दलांनी अतिरेक्यांचा तळ उद्ध्वस्त केला. तेथून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त करण्यात आला.
जम्मू काश्मिर पोलिसांना हरवान भागात अतिरेक्यांचा तळ असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलिसांनी त्यावर हल्लाबोल केला. तेथे युध्दजन्य सामुग्रीचे भांडारच असल्याचे स्पष्ट झाले. तेथे जमीनीत भुसुरुंग, हातबॉम्ब, जीपीएस, एके मॅगेझिन्स जप्त करण्यात आली.
Today, CRPF jawan Sunil Kale, a brave son of Maharashtra (Solapur) got martyred in a clash with militants near Pulwama in Jammu & Kashmir. Heartfelt tribute to him! #Pulwama pic.twitter.com/vd3TnZ8dBf
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 23, 2020
दरम्यान पुलवामा जिल्ह्यात सकाळी आणखी एक चकमक उडाली. बांडोझ क्षेत्रात लपलेल्या अतिरेक्यांना शोधताना झालेल्या या चकमकीत दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले. यावेळी एक जवानही शहीद झाला. हा जवान सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याच्या पानगाव भागातील आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या या जवानाचे नाव सुनील काळे असे आहे.
काळे 2000 मध्ये सेवेत रुजू झाले होते. काही काळापासून त्यांची नियुक्ती जम्मू काश्मिरमध्ये करण्यात आली होती. काळे यांच्या मृत्यूबाबत सोलापूर जिल्हा प्रसासनाने दुजोरा दिला आहे. काळे यांचे पार्थिव आणण्याची प्रक्रिया सुरू आहे.
व्यर्थ न हो बलिदान!
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवान आणि अतिरेकी यांच्यात झालेल्या चकमकीत, महाराष्ट्रातील बार्शी तालुक्यातील पानगावचे सुनील काळे यांना वीरमरण आले. देशासाठी शहीद झालेल्या या जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली🙏 pic.twitter.com/UHHhTmDqzC— Jayant Patil (@Jayant_R_Patil) June 23, 2020