पुलवामासारखा मोठा हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न; सुरक्षा दलांनी उधळला कट

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या पुलावामासारख्या हल्ल्याची योजना सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे टळल्याची माहिती समोर आली आहे. पुलवामाजवळ सुरक्षा दलाने एक मोठा कार बॉम्ब धमका घडवून आणण्याचा डाव उधळून लावला आहे.

माहितीनुसार,  एका सँट्रो कारमध्ये आयईडी (इंम्प्रोव्ह्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस) बसवण्यात आले होते. एक दहशतवादी ही गाडी चालवत होता. परंतु सुरूवातीला करण्यात आलेल्या गोळीबारानंतर अंधाराचा फायदा घेऊन दहशतवादी गाडी तेथेच सोडून पळून गेला.

पांढऱ्या रंगाच्या या गाडीला दुचाकीची नंबर प्लेट लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गाडीची कठुआमध्ये नोंदणी केल्याची माहितीही समोर आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी ही गाडी ट्रॅक केली आणि बॉम्बचा शोध घेण्यात आला. यानंतर बॉम्बस्कॉटच्या मदतीने कारसह आयईडी नष्ट करण्यात आले. या धमाक्यात आजुबाजूच्या भागातील घरांचे नुकसान झाले आहे. कारवर रात्रभर पहारा ठेवण्यात आला. आजुबाजूच्या घरातील लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आल्यानंतर बॉम्ब स्कॉटच्या मदतीने कार नष्ट करण्यात आल्याची माहिती डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिली. सैन्य, पोलिस आणि निमलष्करी दलांचे हे संयुक्त ऑपरेशन होते.

दरम्यान, मागील वर्षी 14 फेब्रुवारीला पुलवामामध्येच 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.