मोकाट फिरणाऱ्यांना चाप

शिनोली, निरगुडसर, पिंगळवाडीत पोलिसांची धडक कारवाई

मंचर -आंबेगाव तालुक्‍यातील शिनोली येथील राजू बाबामिया इनामदार आणि पिंगळवाडी येथील शंकर खुटाण हे विनाकारण फिरत असताना आढळून आल्याने या दोघांवर घोडेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली आहे.

याबरोबरच निरगुडसर येथे करोनाबाधित रुग्ण आढळल्याने हा परिसर पोलिसांनी कंटेन्मेंट झोन जाहीर केलेला असतानाही विनाकारण फिरत असलेल्या अजय निवृत्ती भोंडवे (वय 37) युवकावर या मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रामध्ये फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत असल्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी सांगितले.

शिनोली गावात करोनो विषाणूचा संसर्ग प्रादूर्भाव रोखण्यासाठी कन्टेन्मेंट झोन घोषित केला आहे, तर
पिंगळवाडी (ता. आंबेगाव) येथील शंकर खुटाण यांचा मुलगा मच्छिंद्र खुटाण हा त्याची पत्नी व दोन मुलांसह मुंबई घाटकोपर येथून पिंगळवाडी येथे आलेला आहे. त्या सर्व कुटुंबीयांना 14 दिवस होमक्वारंटाइन राहण्याबाबत पोलीस पाटील गणेश हुले यांच्यामार्फत नोटीस बजावली आहे.

मात्र, शंकर खुटाण हे मोटारसायकलवर (एमएच 01 डब्लू 7770) विनाकारण पिंपळवाडी, घोडेगाव, मंचर परिसरात फिरताना आढळून आल्याने सरकारतर्फे त्यांच्यावर कायदेशीर घोडेगाव पोलीस ठाण्याचे जवान दीपक काशिद यांनी फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस जवान एम. एम. झनकर करीत आहेत.

निरगुडसर हा परिसर देखील कंटेन्मेंट झोन जाहीर केलेला आहे. येथील अजय निवृत्ती भोंडवे ही व्यक्ती त्याच्या ताब्यातील वाहन (एमएच 12 जीएस 3623) घेऊन प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये फिरताना आढळून आला. त्याच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस जवान डी. एस. जाधव यांनी फिर्याद दिली आहे. निरगुडसर गाव हे केंद्रस्थानी मानून त्यापासून पाच किलोमीटरचे क्षेत्र बफरझोन जाहीर करण्यात आले आहे. निरगुडसर परिसरात मंगळवर (दि. 26) पासून 15 दिवस संपूर्णपणे नाकाबंदी करण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.