गुप्त मतदान नको लाईव्ह टेलिकास्ट करण्याचेही आदेश
नवी दिल्ली : राज्यात निर्माण झालेल्या सत्तापेचावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. आज झालेल्या सुनावणीनुसार सर्वोच्च न्यायालयाने उद्याच देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Supreme Court orders Floor Test in the Maharashtra assembly to be held on November 27 before 5 pm. The proceedings shall be live telecast. https://t.co/SLrGeF6et1
— ANI (@ANI) November 26, 2019
एवढेच नाही तर उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वच आमदारांचा शपथविधी करून लगेच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच बहुमत चाचणी करण्याचे सर्व प्रक्षेपण लाईव्ह करण्याचेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित करत या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 24 तासांचा कालावधी न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने बहुमत चाचणी सिद्ध करण्याची सर्व प्रक्रिया ही हंगामी अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली करण्याचेही आदेश दिले आहेत.