UP Lok Sabha Election| उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या 8 जागांसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळी 7 वाजता सुरू झाले आहे. उत्तर प्रदेशमधील दुसऱ्या टप्प्यात एकूण 91 उमेदवारांचे भवितव्य जनता आज ईव्हीएममध्ये ठरवणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रांबाहेर कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. दुसऱ्या टप्प्यात अमरोहा, मेरठ, बागपत, गाझियाबाद, गौतम बुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ आणि मथुरा लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे.
अमरोहा UP Lok Sabha Election|
अमरोहा ही एकमेव जागा आहे जिथे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता. यावेळी भाजपकडून कुंवरसिंह तेवर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सपा-काँग्रेस आघाडीचे दानिश अली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बसपाने मुजाहिद हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हा मतदार संघ भाजपसाठी फार महत्त्वाचा ठरणार आहे. अमरोहा जागेसाठी एकूण 12 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. अमरोहा येथे एकूण 17,16,641 मतदार आहेत.
मेरठ
मेरठ लोकसभा मतदारसंघासाठी सपाने माजी आमदार योगेश शर्मा यांच्या पत्नी सुनीता वर्मा यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने अरुण गोविल आणि बहुजन समाज पक्षाने देवव्रत त्यागी यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर भाजपने सलग तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली आहे. येथील एकूण मतदारांची संख्या 20,00,533 आहे.
बागपत
बागपत लोकसभा जागेवर भाजप आणि आरएलडी यांची युती आहे. आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांनी राजकुमार सांगवान यांना येथून उमेदवारी दिली आहे. सपाने मनोज चौधरी यांना तिकीट दिले आहे. तर बसपाने प्रवीण बैंसला यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. येथील एकूण मतदारांची संख्या 16,53,146 आहे.
अलीगढ UP Lok Sabha Election|
अलीगढमधून भाजपने सतीश गौतम यांना तिकीट दिले आहे, तर सपा आणि काँग्रेस आघाडीने माजी खासदार चौधरी बिजेंद्र सिंह आणि बसपने हितेंद्र उपाध्याय बंटी यांना तिकीट दिले आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार सतीश गौतम यांनी अलिगड लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. येथील एकूण मतदारांची संख्या 19,97,234 आहे.
मथुरा
मथुरेतून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना तिकीट दिले आहे. काँग्रेसने मुकेश धनगर यांना तिकीट दिले असून बसपकडून सुरेश सिंह रिंगणात आहेत. येथील एकूण मतदारांची संख्या 19,29,550 आहेत.
गाझियाबाद
अतुल गर्ग हे गाझियाबादमधून भाजपचे उमेदवार आहेत. काँग्रेसने डॉली शर्मा यांना तिकीट दिले आहे. तर, बहुजन समाज पक्षाकडून नंदकिशोर पुंद्री यांना निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. येथील एकूण मतदारांची संख्या 29,45,487 आहेत.
गौतम बुद्ध नगर
गौतम बुद्ध नगर या जागेवर भाजपने महेश शर्मा यांना तिकीट दिले आहे. येथून सपाने डॉ.महेंद्र नगर यांना तर बसपने राजेंद्रसिंह सोलंकी यांना उमेदवारी दिली आहे. येथील एकूण मतदारांची संख्या 26,75,148 आहे.
बुलंदशहर
बुलंदशहरमधून भाजपने डॉ. भोला सिंह यांना उमेदवारी दिली आहे. शिवराम वाल्मिकी यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. त्यामुळे बसपाने येथून गिरीशचंद्र जाट यांना उमेदवारी दिली आहे. येथील एकूण मतदारांची संख्या 18,59,462 आहेत.
हेही वाचा:
मोठा निर्णय ! EVM ला ‘सर्वोच्च’ क्लीन चिट ; ईव्हीएम संदर्भातल्या सर्व याचिका न्यायालायने फेटाळल्या