कोलंबो – श्रीलंकेने शनिवारी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद यांची जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वकरंडक 2024 पर्यंत संघाचे वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली.
सध्या, जावेद पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) मध्ये क्रिकेट ऑपरेशन्सचा संचालक आणि लाहोर कलंदर्सचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम करत आहेत. श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऍशले डी सिल्वा याबद्दल माहिती दिली आहे.
51 वर्षीय जावेद यांनी यापूर्वी पाकिस्तानच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ संघ तसेच अफगाणिस्तान आणि यूएई संघांसोबत काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, यूएई संघ 2015 मध्ये एकदिवसीय विश्वकरंडकासाठी पात्र ठरला होता. जावेद यांनी पाकिस्तानकडून 22 कसोटी आणि 163 एकदिवसीय सामन्यांमध्ये 236 बळी घेतले आहेत.