Women’s T20 World Cup 2024 Schedule :- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) महिला टी-20 विश्वकरंडक 2024 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा यंदा बांगलादेशमध्ये खेळवली जाणार आहे. यावेळी विश्वकरंडक स्पर्धेत एकूण 10 संघ असतील, ज्यामध्ये अंतिम सामन्यासह एकूण 23 सामने 19 दिवसात खेळवले जातील.
सर्व 10 संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक संघाला प्रत्येक गटात 4-4 सामने खेळावे लागतील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर चार संघांमध्ये प्लेऑफच्या लढती होतील.
या स्पर्धेला इंग्लंड वि.दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील सर्व सामने ढाका आणि सिल्हेत येथे खेळवले जाणार आहेत. तर उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी होणार आहेत. 20 ऑक्टोबर रोजी ढाका येथे अंतिम सामना खेळवला जाईल.
वेळापत्रकानुसार आयसीसी महिला T20 विश्वचषकाचा पहिला सामना 3 ऑक्टोबर रोजी ढाका येथे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध 4 ऑक्टोबरला सिल्हेटमध्ये होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान #INDvsPAK या पारंपारिक विरोधी संघांमधील हाय होल्टेज सामना 6 ऑक्टोबर रोजी सिल्हेट येथे खेळविण्यात येईल.
टी20 विश्वचषक 2023 मध्ये भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला होता. हा सामना 19 षटकांत जिंकला होता. 2023 चा टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आतापर्यंत सहा वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि क्वालिफायर 1 संघ असणाऱ्या अ गटात सामावेश करण्यात आला आहे.
The ICC Women’s #T20WorldCup 2024 in Bangladesh to commence on 3 October with the final slated for 20 October.
Details 👉 https://t.co/MRtx7UXXPM pic.twitter.com/v4jBsD0gIe
— ICC (@ICC) May 5, 2024
टी-20 विश्वकरंडकसाठीचे गट…
अ : ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, क्वालिफायर-1
ब : दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, क्वालिफायर-2
महिला T20 विश्वचषक 2024 चे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे….
ऑक्टोबर 3, गुरुवार : (इंग्लंड विरूध्द दक्षिण अफ्रीका, ब गट), दुपारी 2:30 वाजता, ढाका
ऑक्टोबर 3, गुरुवार : (बांग्लादेश विरूध्द क्वालीफायर 2 ,ब गट), संध्याकाळी 6:30 वाजता,ढाका
ऑक्टोबर 4, शुक्रवार : (ऑस्ट्रेलिया विरूध्द क्वालीफायर 1,अ गट), दुपारी 2:30 वाजता,सिलहट
ऑक्टोबर 4, शुक्रवार : (भारत विरूध्द न्यूजीलंड,अ गट), संध्याकाळी 6:30 वाजता, सिलहट
ऑक्टोबर 5, शनिवार : (दक्षिण अफ्रीका विरूध्द वेस्टइंडीज, ब गट), दुपारी 2:30 वाजता,ढाका
ऑक्टोबर 5, शनिवार : (बांग्लादेश विरूध्द इंग्लंड,ब गट), संध्याकाळी 6:30 वाजता,ढाका
ऑक्टोबर 6, रविवार : (न्यूजीलंड विरूध्द क्वालीफायर 1, अ गट), दुपारी 2:30 वाजता,सिलहट
ऑक्टोबर 6, रविवार : (भारत विरूध्द पाकिस्तान,अ गट), संध्याकाळी 6:30 वाजता, सिलहट
ऑक्टोबर 7, सोमवार : (वेस्टइंडीज विरूध्द क्वालीफायर 2, ब गट), संध्याकाळी 6:30 वाजता, ढाका
ऑक्टोबर 8, मंगलवार : (ऑस्ट्रेलिया विरूध्द पाकिस्तान, अ गट), संध्याकाळी 6:30 वाजता,सिलहट
ऑक्टोबर 9, बुधवार : (बांग्लादेश विरूध्द वेस्टइंडीज,ब गट), दुपारी 2:30, ढाका
ऑक्टोबर 9, बुधवार : (भारत विरूध्द क्वालीफायर 1, अ गट), संध्याकाळी 6:30 वाजता, सिलहट
ऑक्टोबर 10, गुरुवार : (दक्षिण अफ्रीका विरूध्द क्वालीफायर 2,ब गट), संध्याकाळी 6:30 वाजता, ढाका
ऑक्टोबर 11, शुक्रवार : (ऑस्ट्रेलिया विरूध्द न्यूजीलंड,अ गट), दुपारी 2:30, सिलहट
ऑक्टोबर 11, शुक्रवार : (पाकिस्तान विरूध्द क्वालीफायर 1,अ गट), संध्याकाळी 6:30 वाजता, सिलहट
ऑक्टोबर 12, शनिवार : (इंग्लंड विरूध्द वेस्टइंडीज,ब गट), दुपारी 2:30, ढाका
ऑक्टोबर 12, शनिवार : (बांग्लादेश विरूध्द दक्षिण अफ्रीका, ब गट), संध्याकाळी 6:30 वाजता, ढाका
ऑक्टोबर 13, रविवार : पाकिस्तान विरूध्द न्यूजीलंड,अ गट), दुपारी 2:30 वाजता, सिलहट
ऑक्टोबर 13, रविवार : भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया,अ गट), संध्याकाळी 6:30 वाजता, सिलहट
ऑक्टोबर 14, सोमवार : इंग्लंड विरूध्द क्वलीफायर 2, ब गट), संध्याकाळी 6:30 वाजता, ढाका
ऑक्टोबर 17, गुरुवार : TBD (To Be Decided) सेमीफाइनल 1, संध्याकाळी 6:30 वाजता, सिलहट
ऑक्टोबर 18, शुक्रवार : TBD (To Be Decided) सेमीफाइनल 2, संध्याकाळी 6:30 वाजता, ढाका
ऑक्टोबर 20, रविवार : TBD (To Be Decided) फाइनल, संध्याकाळी 6:30 वाजता, ढाका