हैदराबाद : आयपीएल 2023 चा चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आहे. या सामन्यात दोन्ही संघ त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंशिवाय खेळतील. अशा स्थितीत दोन्ही संघांसमोर विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याचे मोठे आव्हान असेल.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भुवनेश्वर कुमार हैदराबादचा कर्णधार आहे. या संघाचा नियमित कर्णधार एडन मार्कराम सध्या उपलब्ध नाही. काही सामन्यांनंतर तो संघात सामील होईल.
🚨 Toss Update 🚨@SunRisers have elected to bowl against @rajasthanroyals in Match 4⃣ of the #TATAIPL
Follow the match ▶️ https://t.co/khh5OBILWy#SRHvRR pic.twitter.com/Nvh4WznrCq
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
हैदराबाद संघात फजलहक फारुकी, हारू ब्रूक, आदिल रशीद आणि ग्लेन फिलिप्स हे विदेशी खेळाडू आहेत. त्याच वेळी, जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर आणि ट्रेंट बोल्ट हे राजस्थानच्या संघात परदेशी खेळाडू आहेत.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11 खालीलप्रमाणे –
राजस्थान रॉयल्स :- यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, केएम आसिफ, युझवेंद्र चहल.
सनरायझर्स हैदराबाद :- मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), उमरान मलिक, आदिल रशीद, भुवनेश्वर कुमार (कर्णधार), टी नटराजन, फजलहक फारुकी.