मुंबई – आयपीएल 2023 च्या 69 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. प्लेऑफसाठी रोहितच्या पलटणला हैदराबादला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागणार आहे. याशिवाय मुंबईला दुसरा कोणताही मार्ग नाही. तर सनरायझर्स शेवटच्या विजयासाठी मैदानात उतरले.
आयपीएल 2023 च्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी मुंबई इंडियन्सला हा विजय महत्वाचा आहे. या मोसमात मुंबईने आतापर्यंत 13 सामने खेळली आहे. त्यापैकी 7 सामन्यात संघाने विजय मिळवला आहे, तर सहा सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या सामन्यात मुंबईला लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. फलंदाजीत कर्णधार रोहित आणि इशान किशनची फलंदाजी चुरशीची होती, तर जेसन बेहरेनडॉर्फने गोलंदाजीत कहर केला.
हैदराबाद खेळ खराब करू शकतो
गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट होती. हेन्रिक क्लासेनने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्याचवेळी हॅरी ब्रूक्सही बॅटसह फॉर्ममध्ये दिसत होता. मात्र, आरसीबीविरुद्ध संघाच्या गोलंदाजांनी चांगलीच निराशा केली. भुवनेश्वर कुमारने आपल्या चार षटकांत ४८ धावा दिल्या होत्या, तर कार्तिक त्यागी आणि टी नटराजनही महागडे ठरले.
MI vs SRH संभाव्य टीम
मुंबई इंडियन्स संभाव्य प्लेइंग 11: इशान किशन, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, हृतिक शोकीन, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मडवाल.
सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग 11: अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, अॅडम मार्कराम, हेनरिक क्लासेन, हॅरी ब्रूक्स, ग्लेन फिलिप, अब्दुल समद, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, नितीश रेड्डी, टी नटराजन.