हैदराबाद : आयपीएल 2023 चा चौथा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आहे. या सामन्यात दोन्ही संघ त्यांच्या काही प्रमुख खेळाडूंशिवाय खेळतील. अशा स्थितीत दोन्ही संघांसमोर विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्याचे मोठे आव्हान असेल.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर यशस्वी जैसवाल, जोस बटलर आणि संजू सॅमसनच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 20 षटकांत 5 बाद 203 धावा करताना हैदराबादसमोर 204 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Innings Break!
A solid batting display from @rajasthanroyals as captain @IamSanjuSamson, @josbuttler & @ybj_19 scored cracking FIFTIES 👌 👌
Will @SunRisers chase the target down 🤔
Scorecard ▶️ https://t.co/khh5OBILWy #TATAIPL | #SRHvRR pic.twitter.com/wM7ma5zvzH
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलर, यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसन यांनी अर्धशतकी खेळी केल्या. संजू सॅमसनने 32 चेंडूत 55 धावा, यशस्वी जैस्वालने 37 चेंडूत 54 धावा आणि जोस बटलरने 22 चेंडूत 54 धावा केल्या. शेवटी, शिमरॉन हेटमायरने 16 चेंडूत नाबाद 22 धावा केल्या.
त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादकडून फजलहक फारुकी आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. उमरान मलिकला ब्रेकथ्रू मिळाला. या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणे हैदराबादसाठी सोपे नसेल.