मुंबई – अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच तिच्या परखड मतांमुळे चर्चेत असते. अनेकदा तिच्या विधानामुळे ती वादातच्या भोवऱ्यात अडकली आहे. त्यानंतर आता तिने आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यात केतकीने तिची हत्या होऊ शकते, असे म्हंटले आहे. तिच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
केतकीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी अजूनही न्याय मिळण्यासाठी लढा देत आहे. जामिनावर सुटका झालेली मी एकमेव नाही. तुम्ही नवीन गुन्हे माझ्यावर दाखल केले आहे. माझ्याबद्दल खोट्या बातम्या दिल्या तरी मी सत्य बोलणार. मी सत्य बोलण्याने तरी मरेन किंवा गप्प राहिल्याने तरी माझा मृत्यू होईल. लोकांना सत्य ऐकायला किंवा वाचायला आवडत नाही कारण ते धोकादायक आहे. सत्य लपवण्यासाठी ते लोकांची हत्या करायला तयार असतात,” असे केतकीने पोस्टमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, अभिनेत्री केतकीने याआधी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. यावरून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यामुळे तिला अटक देखील करण्यात आली होती. मात्र तरीही ती आजही प्रत्येक विषयावर तिचे मत व्यक्त करते. यावरून तिला अनेकदा ट्रोलही केले जाते.