मुंबई – अभिनेता सुनील शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, ‘मला माझ्या दोन मुलांना अहान आणि अथियाला भारतीय शाळेत शिकवायचे नव्हते. मुलांना विशेष वागणूक मिळू नये या साठी मला त्यांना अमेरिकन बोर्डात शिकवायचे होते.अशी माझी इच्छा होती की त्यांनी अमेरिकन बोर्डात शिकावे.’ अमेरिकन बोर्डात शिकण्यासाठी खूप खर्च करावा लागणार हे सुनीलला माहीत होतं.
सुनीलने पुढे सांगितले की, ‘सुरुवातीच्या काळात जेव्हा चित्रपट चालत नव्हते, तेव्हा याचा वैयक्तिक आयुष्यावर वाईट परिणाम झाला होता. समीक्षक त्यांच्या चित्रपटांवर टीका करायचे. त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबावरही झाला. त्यामुळे मुलांना बाहेर पाठवायचे होते.’
माझ्या मुलांना शाळेत विशेष वागणूक मिळू नये अशी माझी इच्छा होती. त्यांनी तिथे सामान्य मुलांप्रमाणे अभ्यास करावा अशी माझी इच्छा होती. माझे मुलं एका सेलिब्रिटीचे मूल आहे अशी त्या दोघांचीही चर्चा शहरामध्ये होऊ नये असे मला नेहमी वाटत असे. मला मुलांना मोकळे सोडायचे होते. आणि ही युक्ती देखील कामी आली. मला अजूनही आठवतंय की पप्पा त्यावेळी पैशाबद्दल बोलले होते. जरी मी त्यांना समजावून सांगितले होते की मी व्यवस्थापित करीन.’
मी माझ्या मुलांना कधीही अभिनेता बनण्यासाठी प्रेरित केले नाही. एकदा आम्ही अथियाच्या अॅडमिशनसाठी अमेरिकेतील अटलांटा येथे गेलो होतो. आम्ही तिला तिथल्या कॉलेजमध्ये प्रवेशही मिळवून दिला. माझ्या लेकीलाही कॉलेज खूप आवडलं. असेही त्यांनी या मुलाखतीत सांगितले.