मुंबई – बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा 2012 साली प्रदर्शित झालेला OMG चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला होता. यानंतर आता लवकरच OMG 2 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे दोन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. अक्षय कुमारने हे पोस्ट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र त्याचे हे पोस्ट नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेले नाही. या चित्रपटात हिंदू धर्माविषयी अपमानजनक दाखवलेले नसावे, असे अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे.
‘ओएमजी’ या चित्रपटात अक्षय कुमार श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता ‘ओएमजी २’मध्ये अक्षय भगवान शंकराच्या अवतारात दिसणार आहे. पोस्टरमध्ये अक्षयच्या कपाळावर भस्म, गळ्यात रुद्राक्षांची माळ अशा शंकराच्या अवतारात दिसत आहे. त्याने हे पोस्टर शेअर करत लिहिलं की, ‘ओएमजी २’ ११ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर लवकरच येईल.” तर पंकज त्रिपाठी असलेला दुसरे पोस्टर शेअर करत अक्षयनं लिहिलंय, ‘सत्याच्या मार्गावर भेटू.’
हे पोस्टर पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले की, ‘जर या चित्रपटात हिंदू धर्माविषयी काही उलटसुलट दाखवलं, तर काही खैर नाही. कारण- बॉलीवूडचे चित्रपट जेव्हा पाहतो तेव्हा त्यात हिंदू धर्माविषयीच अपमानजनक चित्रण दाखवलं जातं. तुमच्याकडून चांगली अपेक्षा आहे. ‘हिंदू धर्माचा अपमान केला तर विचार करा काय होईल?”
‘ओएमजी २’ चित्रपटात अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठीव्यतिरिक्त अभिनेत्री यामी गौतम प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. येत्या ११ ऑगस्टला ‘ओमएमजी २’ या चित्रपट रिलीज होणार आहे.