Kranti Redkar Challenge| मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर सक्रिय असते. अनेक व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.ल्या प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतेच तिने एक व्हिडिओ शेअर करत स्वत:लाच एक आव्हान दिले आहे. इतकेच काय तर ‘मी हे केले नाही तर माझं नाव बदला’, असेही तिने म्हंटले आहे.
क्रांती रेडकरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. “माझ ठरलंय” असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. यात ती म्हणाली आहे की, “माझं ठरलंय. येत्या दहा दिवसांत मी पाच किलो वजन कमी करणार आहे आणि जर मी असं नाही केलं तर माझ नाव बदलून टाका. दुसरं काहीतरी चांगलं ठेवा.” Kranti Redkar Challenge|
View this post on Instagram
तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केली आहे. “वजन काटा कमी करून टाका, वजन आपोआप कमी होईल” असा टोला देखील लगावला आहे. तर काही जणांनी “झालं तर क्रांती नाही तर आंटी,” “उत्क्रांती”अशी नवीन नावे सुचवली आहेत.
दरम्यान, क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘रेनबो’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, ऊर्मिला कोठारे, प्रसाद ओक. हितेन पटेल, ऋषी सक्सेना हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. Kranti Redkar Challenge|
हेही वाचा: