Imran Khan Comeback| अभिनेता इमरान खानने ‘जाने तू या जाने’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र त्यानंतर त्याला सिनेसृष्टीत फार चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र इंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्यानंतर आता 9 वर्षानंतर इमरान खान अभिनयाच्या दुनियेत परतणार आहे. ‘हॅप्पी पटेल’ असे त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे.
इमरान खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. आता इम्रानच्या पुनरागमनाची माहिती मिळताच चाहते देखील आनंदी झाले आहेत. या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. इम्रान खानने या चित्रपटाचे गोव्यात शूटिंग सुरू केले आहे.
इमरानसोबत या चित्रपटात मुख्य अभिनेत्री कोण असेल हे अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र मोना सिंग या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा होत आहे. मोनाने यापूर्वीही आमिर खानच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने लाल सिंग चड्ढा, 3 इडियट्समध्ये काम केले आहे. Imran Khan Comeback|
इमरान खानच्या कमबॅक चित्रपटाचे नाव आहे ‘हॅप्पी पटेल’ आहे. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे आमिर खानचा यात कॅमिओ होणार आहे. हॅप्पी पटेलबद्दल सांगायचे तर, हा एक विनोदी चित्रपट असणार आहे. हा चित्रपट आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनवला जात आहे. हॅप्पी पटेलनंतर इमरान खान लवकरच वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. सध्या त्याला पुन्हा एकदा नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहतेही आतुर झाले आहेत.
हेही वाचा:
‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्री रुग्णालयात दाखल; फोटो शेअर करत दिली माहिती