Saumya Tandon| अभिनेत्री सौम्या टंडन ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. या मालिकेतील गोरी मॅमची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली. आजही तिला या भूमिकेमुळे सर्वाधिक ओळखले जाते. मात्र सध्या सौम्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सौम्याची तब्येत बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सौम्याने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. सौम्याच्या हातावर ड्रिप असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टा अकाऊंटवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. “फोटो नेहमीच सुंदर नसतात आणि आयुष्य नेहमीच हसत नसतं. माझी प्रकृती सुधारत आहे आणि लवकरच मी फिट होऊन परत येईन. तुम्ही सर्वांनी केलेल्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद” असंही सौम्याने म्हटलं आहे. हा फोटो पाहून चाहते सौम्याच्या प्रकृतीची चिंता करत आहेत.
View this post on Instagram
सौम्याला नेमकं काय झाले आहे. अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. अनेकांनी कमेंट करून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, सध्या सौम्या ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत काम करत नाही. मात्र तरी देखील या मालिकेतील तिच्या भूमिकेची क्रेझ चाहत्यांना आहे.
दरम्यान, सौम्याने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. यानंतर तिने’जब वी मेट’ आणि ‘वेलकम टू पंजाब’मध्ये काम केले आहे. पण खऱ्या अर्थाने तिला ‘भाभी जी घर पर है’ या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. याशिवाय सौम्या ‘ऐसा देस है मेरा’, ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्येही दिसली आहे. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर सौम्याने 2016 मध्ये बॉयफ्रेंड सौरभ देवेंद्र सिंहसोबत लग्न केले. याआधी दोघांनी 10 वर्षे एकमेकांना डेट केले होते.