Sudhir Mungantiwar : युट्युबर एल्वीश यादव याच्यावर रेव्ह पार्टी आणि सापाचे विष पार्ट्यांमध्ये पुरवल्याचा आरोप लावण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधारी यांचे एक्मेकांवर आरोप सुरु आहेत. त्यातच ड्रग्ज व्यवसायात कोणत्याही नेत्याचा संबंध असो, त्याला ठेचून काढलंच पाहीजे असे वक्तव्य राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलं.
एल्वीश यादवप्रकरणावर बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी, “जे आमदार, खासदार होतील, त्यांच्या कुटुंबात अमली पदार्थांचं लायसन्स असता कामा नये. काँग्रेसच्या नेत्यांची मी यादी देऊ शकतो ज्यांच्याकडे असे लायसन्स आहेत असेही मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, ड्रग्ज विषयात कोणत्याही प्रकारचं राजकारण होऊ नये” असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेबाबात मुनगंटीवार यांनी विचारण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, एखाद्या नेत्यानं मुख्यमंत्री व्हावं ही इच्छा व्यक्त करण्यात गैर काहीच नाही. अपात्रतेच्या सुनावणीत काही अघटीत घडायचंच असेल तरी त्याचा मुख्यमंत्रीपदाशी काहीच संबंध नाही. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंच आहे की विधानपरिषदेचा मार्ग मोकळा आहे. एकनाथ शिंदेंच्याच माध्यमातून 2024 च्या निवडणूका लढवणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
मंत्रीमंडळाचा विस्तार चाय पे चर्चा करुन होत नाही, अमितभाई, मुख्यमंत्री आवश्यक असेल तिथे देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची मदत घेऊन मंत्रीमंडळ विस्तार होईल असे मुनंगंटीवार म्हणाले. राज्यातील सत्ता संघर्षाबाबत बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयानं अमुक एका बाजुनं निर्णय द्या, असे सांगितले नाही. निर्णय वेगानं व्हावा ही सर्वसामान्यांच्या भावना असू शकते असे मुनंगटीवार म्हणाले.
जो हारणारा असतो तो निवडणुकीत प्रतिस्पर्ध्यावर पैसे वाटण्याचा आरोप करतोच. भाजपचा कोणी कार्यकर्ता काटेवाडीत प्रतिस्पर्ध्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप करत असतील तर तो हारणारा असेल. आम्ही जर प्रतिस्पर्ध्यावर पैसे वाटत असल्याचा आरोप करत असु तर पराभवाच्या मानसिकतेत जात असू असे मुनगंटीवार म्हणाले. मी एक प्रस्ताव तयार करतोय की सर्व जातीच्या प्रमुखांना एकत्र घेऊन आपापल्या जातीच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करायचा असल्याचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.