Steve Smith – ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ मागील काही काळात नेटकऱ्यांचा टीकेच्या निशाण्यावर राहिला आहे. स्मिथच्या टी-२० क्रिकेटमधील संथ खेळीमुळे अनेकदा त्याला संघाबाहेर बसवले होते. त्याचबरोबर नेटकऱ्यांकडून तो आता टी-२० क्रिकेट खेळण्याच्या स्तराचा खेळाडू नसल्याचे म्हटले जाते. दरम्यान, स्मिथने त्याच्या दमदार खेळीने टीका करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. ऑस्ट्रेलियाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या बिग बॅश लीगमध्ये तो दमदार फॉर्ममध्ये खेळत आहे. यंदाच्या मोसमातील चार सामन्यांमध्ये त्याने ३२८ धावा फाटकावल्या आहेत. पहिल्या सामन्यात ३६ धावा, दुसऱ्या सामन्यात १०१ धावा, तिसऱ्या सामन्यात १२५ धावा आणि आजच्या सामन्यात त्याने २००च्या स्ट्राईक रेटने ६६ धावा केल्या.
IND vs NZ 2023 । टीम इंडियाला निर्विवाद वर्चस्वाची संधी; उद्या तिसरा एकदिवसीय सामना
टी-२० क्रिकेटमध्ये संथ गतीने खेळण्याच्या मुद्यावरून स्टीव्ह स्मिथ अनेकवेळा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलाय. मात्र, सध्या तो ज्या फॉर्ममध्ये टी-२० क्रिकेट खेळत आहे, हे पाहून त्याच्यावर टीका करणारी मंडळी आता गप्प झाली आहे. या मोसमात मर्यादित षटकांच्या स्पर्धेत त्याने दोन शतके झळकावली आहेत. त्याने आजच्या सामन्यात शतकीय खेळी केली असती तर तो मोठ्या विक्रमाचा मानकरी ठरला असता. स्मिथने सलग दोन शतके झळकावली असून मोठ्या टी-२० लीगमध्ये सलग तीन शतके ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरला असता.
IND vs NZ 2023 | भारतीय खेळाडू बाबा महाकालच्या दर्शनाला; ऋषभ पंतसाठी केली प्रार्थना
आजच्या खेळीदरम्यान स्मिथने एका अनोख्या कामगिरीची नोंद केली आहे. बीबीएलच्या सामन्यात हॉबार्ट हरिकेन्सचा गोलंदाज जोएल पॅरिसच्या दुसऱ्या षटकात स्टीव्ह स्मिथ फलंदाजी करत होता. त्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर स्मिथने षटकार मारला पण पंचांनी या चेंडूला नो बॉल ठरवले. यानंतर पॅरिसने पुढचा चेंडू खूपच वाइड फेकल्याने तो यष्टिरक्षकाला अडवता न आल्याने सीमारेषेला गेला. ज्यामुळे सिडनी संघाला ५ धावा मिळाल्या आणि फ्री हिट अजूनही शाबूत होता. त्यानंतरच्या चेंडूवर स्मिथने चौकार मारला आणि अशा प्रकारे नियमानुसार सिडनी सिक्सर्स संघाला १ चेंडूवर १६ धावा मिळाल्या.
15 runs off one legal delivery! 😵💫
Steve Smith’s cashing in once again in Hobart 🙌#BucketBall #BBL12 pic.twitter.com/G3YiCbTjX7
— KFC Big Bash League (@BBL) January 23, 2023
स्टीव्ह स्मिथने मागील दोन सामन्यात १०१ आणि १२५ धावांच्या तुफानी शतकी खेळी खेळल्या आहेत. त्यामुळे टी-२० लीगमध्ये सलग दोन शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्टीव्ह स्मिथ आता १०व्या स्थानावर पोहोचला आहे. त्यानंतर आजच्या सामन्यातही स्टीव्ह स्मिथने २००च्या स्ट्राइक रेटने ३३ चेंडूत ६६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि ६ षटकारही फाटकावले. महत्वाचं म्हणजे यंदाच्या आयपीएल हंगामासाठी स्मिथला कोणत्याही संघाने खरेदी केलेले नाही.