IND vs NZ – भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करत ३ सामन्याच्या मालिकेत २-०ने विजयी आघाडी आहे. पहिल्या सामन्यात जबरदस्त फलंदाजी तर दुसऱ्या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवला. त्यानंतर आता दोन्ही संघातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना मंगळवारी २४ जानेवारीला इंदुर येथील होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला या मालिकेत न्यूझीलंडला क्लीन स्वीप देण्याची संधी असणार आहे. दरम्यान, भारतीय संघाचे काही खेळाडू उज्जैनच्या बाबा महाकालच्या दर्शनासाठी गेले होते.
23 जानेवारीला सकाळच्या सुमारास भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर उज्जैनमधील बाबा महाकाल दर्शन मंदिरात पोहोचले. भगवान महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरतीचे दर्शन घेतल्यानंतर तिघांनीही महाकालला जलअभिषेक केला. यावेळी उपस्थित पंडितांनी हर हर महादेवचा जयघोषही केला. यावेळी तिन्ही खेळाडूंनी अंगावर सोवळं नेसलेले होते. सूर्यकुमार यादव यांच्यासह कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांनीही सोमवारी सकाळी भस्म आरतीनंतर महाकालचा आशीर्वाद घेतला.
Madhya Pradesh | Indian cricketers Suryakumar Yadav, Kuldeep Yadav, and Washington Sundar visited Mahakaleshwar temple in Ujjain and performed Baba Mahakal’s Bhasma Aarti. pic.twitter.com/nnyFRLMbfa
— ANI (@ANI) January 23, 2023
यावेळी माध्यमांशी बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, ‘महाकालचे दर्शन झाल्याने खूप आनंद झाला. ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही प्रार्थना केली. त्याने संघात खेळण्यासाठी लवकर बरे व्हावे, कारण त्याचे पुनरागमन आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्ही न्यूझीलंडविरुद्धची मालिका आधीच जिंकली आहे, आता त्यांच्याविरुद्धच्या होणाऱ्या अंतिम सामन्याची प्रतीक्षा आहे.’
We prayed for the speedy recovery of Rishabh Pant. His comeback is very important to us. We have already won the series against New Zealand, looking forward to the final match against them: Cricketer Suryakumar Yadav pic.twitter.com/2yngbYZXfb
— ANI (@ANI) January 23, 2023