#CWC19 : स्टीव्ह स्मिथकडून कोहलीवर स्तुतिसुमने

लंडन – पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने स्तुतिसुमने उधळली आहेत. भारताने विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचाही पराभव केला आहे.

स्मिथ याने सांगितले की, ‘पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचे वेळी भारतीय चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. परंतु काही प्रेक्षक पाकिस्तानचे पाठीराखे होते. या चाहत्यांकडून कोहली याला डिवचण्याचा प्रयत्न झाला. कोहली याने त्याकडे दुर्लक्ष केले. आमच्या सामन्यातही कोहली हा फलंदाजी करीत असताना त्याच्या चाहत्यांकडून त्याला प्रोत्साहन मिळत होते. मात्र, त्यांच्यामुळे आमच्या क्षेत्ररक्षकांना त्रास होत आहे असे लक्षात आल्यानंतर त्याने या प्रेक्षकांना शांत बसण्याचे आवाहन केले व प्रेक्षक शांत झाले. त्यामधूनच कोहली याची खिलाडूवृत्ती दिसून येते.

Leave A Reply

Your email address will not be published.