#CWC19 : आमच्या दुखापतीची काळजी नसावी -मॉर्गन

मॅंचेस्टर – कर्णधार इऑन मॉर्गन व जेसन रॉय यांच्या दुखापतीची समस्या इंग्लंडला जाणविणार असली तरी आज अफगाणिस्तानविरुद्ध सोपा पेपर असल्यामुळे त्यांना हा सामना जिंकून उपांत्य फेरीसाठी आपले स्थान बळकट करण्याचे वेध लागले आहेत. इंग्लंडच्या संघातील दुखापतग्रस्त खेळाडूमुळं त्यांच्या संघाचे चाहते काळजीत आहेत, पण इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन याने आमच्या दुखापतीची काळजी नसावी असा संदेश चाहत्यांना दिला आहे.

मी व जेसन आम्ही दोघेही खेळू शकणार नसलो तरी आमच्या चाहत्यांनी विनाकारण काळजी करण्याची गरज नाही. आमच्या संघातील अन्य खेळाडूंकडे सामना जिंकण्याची क्षमता आहे. आम्हाला उपांत्य फेरीत स्थान मिळवायचे आहे. त्या दिशेनेच आम्ही प्रगती करीत आहोत, असे मॉर्गन याने सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.