पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. 4 ते 6 डिसेंबर 2021 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य लेखी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादीही आयोगाने प्रसिद्ध केली आहे.
या सर्व उमेदवारांच्या मुलाखती दि. 18 ते 22 एप्रिल व दि. 25 ते 29 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात येणार आहे. मुलाखतीचे ठिकाण व सविस्तर मुलाखतीचे वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.