तिरुपती – शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पहाटे तिरुपती देवस्थाना भेट दिली आहे. यावेळी आदित्य ठाकरेंनी व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. सध्या सोशल मीडियावर आदित्य यांचे मंदिरातील हे व्हायरल होत आहे.
नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने जमीन देण्याबाबतचे पत्र आदित्य ठाकरे यांनी देवस्थानचे अध्यक्ष वाय व्ही सुब्बा रेड्डी यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
दरम्यान, जमीन वाटपाचे पत्र देण्यासाठी स्वतः मंत्री आदित्य ठाकरे तिरुपतीला आले याविषयीही त्यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले. आज पहाटे आदित्य ठाकरे यांचे तिरुपती येथे आगमन झाले. यावेळी त्यांच्या सोबत तिरुपती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सदस्य देखील उपस्थित होते.