मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे याबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर आरोप प्रत्यारोप यांना सुरुवात झाली आहे. आता राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे उद्या १ मे रोजी जाहीर सभा होणार असून त्याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा जाहीर केले आहे. यातच शिवसेनेकडून अशी माहिती देण्यात आली आहे की,’शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येचा दौरा करणार आहे. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.हे.
दरम्यान, ५ जून रोजी मी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार असून श्री रामाचे दर्शन घेणार असल्याचे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले. राज ठाकरे यांच्या पाठोपाठ आता उद्धव ठाकरे सुद्धा अयोध्येला जाणार असल्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच राज ठाकरे प्रखर हिंदुत्ववादी असल्याचे त्यांच्या भाषणातून दाखवत असतांनाच शिवसेननेही आपणही हिंदुत्वादी असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
तत्पूर्वी आज सकाळी राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जाऊ मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या सभेला कितीही विरोध झाला किंवा कितीही केसेस झाल्या तरी त्या आम्ही अंगावर घेण्यासाठी तयार असल्याचे म्हटले.
राज ठाकरेंच्या सभेला पोलिसांनी अटीशर्थींसह मान्यता दिली आहे. त्यात आवाजाची मर्यादाही आहे. 50 ते 55 डेसिबलपर्यंत आवाज असावा असे पोलिसांनी म्हटले आहे. हे पाळणं शक्य आहे का? असा सवाल अमित ठाकरे यांना करण्यात आला. त्यावर तेवढं ठीक आहे. आम्ही केसेस घ्यायला तयार आहोत. तुम्हाला आधीही बोललो आहे, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.