डेक्कन जिमखाना इलेव्हन संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 स्पर्धा

पुणे – स्वप्निल उगलेच्या 73 धावा आणि 1 बळी अशा अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर डेक्कन जिमखाना इलेव्हन संघाने आर्यन्स स्पोर्टस क्‍लबचा 26 धावांनी पराभव करून सलग तिसऱ्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना क्‍लब येथील क्रिकेट मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना डेक्कन जिमखाना इलेव्हन संघाने 50 षटकांत 9 बाद 249 धावा केल्या. यात स्वप्निल उगलेने 66 चेंडूत 10 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 73 धावा केल्या. त्याने धीरज फतंगरे (32 धावा) याच्या साथीत दुसऱ्या गडयासाठी 52 चेंडूत 51 धावांची भागीदारी केली. त्यानंतर अभिषेक ताटेने 49 चेंडूत 54 धावा धावा, तुषार श्रीवास्तवने 19 धावा काढून संघाला 249 धावांचे आव्हान उभे करून दिले.

आर्यन्स संघाकडून स्वराज वाबळेने 45 धावात 3 गडी बाद केले.प्रत्युत्तरात खेळताना आर्यन्स स्पोर्टस क्‍लब संघाचा डाव 37.4 षटकांत 220 धावांवरच संपुष्टात आला. यात हरी सावंतने एकाबाजूने लढताना 52 चेंडूत 65 धावा करत अजिंक्‍य गायकवाडच्या (29) साथीत पहिल्या गडयासाठी 51 चेंडूत 54 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर हर्ष संघवीच्या 24 धावा व तनय संघवीच्या 28 धावा यांनी चौथ्या गडयासाठी 48 चेंडूत 50 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले.

मात्र, स्वप्निल उगलेने तनय संघवीला धावबाद करून सामन्यास कलाटणी दिली. संघातील तळातील एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. डेक्कन जिमखाना संघाकडून पियुश साळवी (3-43), मुकेश (3-41) यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

सविस्तर निकाल:

साखळी फेरी: डेक्कन जिमखाना इलेव्हन: 50 षटकांत 9 बाद 249 धावा(स्वप्निल उगले 73 (66,10चौकार, 1षटकार), अभिषेक ताटे 54 (49, 7 चौकार), धीरज फतंगरे 32 (38, 5चौकार), तुषार श्रीवास्तव 19 (17), स्वराज वाबळे 3-45, शुभम हरपाळे 2-51, अजिंक्‍य चौगुले 1-20, हरी सावंत 1-39) वि.वि. आर्यन्स स्पोर्टस क्‍लब: 37.4 षटकांत सर्वबाद 220 (हरी सावंत 65 (52, 4 चौकार), अजिंक्‍य गायकवाड 29 (46), हर्ष संघवी 24(30), तनय संघवी 28(32), पियुश साळवी 3-43, मुकेश 3-41, प्रखर अगरवाल 2-19, स्वप्निल उगले 1-37);सामनावीर-स्वप्निल उगले.

Leave A Reply

Your email address will not be published.