क्रिकेट : इंडियन बॅंक, ऍटॉससिंटेल संघाचे विजय

प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धा

पुणे – इंडियन बॅंक आणि ऍटॉससिंटेल या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत येथे होत असलेल्या प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-20 क्रिकेट स्पर्धेत आगेकूच कायम राखली आहे.

कटारिया हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या पहिल्या लढतीत इंडियन बॅंक संघाने आयरिसर्च संघावर 41 धावांनी मात केली. इंडियन बॅंकेने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 163 धावा केल्या. यात सौरभकुमारने 50 चेंडूंत 7 चौकार व 2 षटकारांसह 57, तर विजय के. याने 33 चेंडूंत 5 षटकार व 3 चौकारांसह 52 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतरांनी निराशा केली. लक्ष्याचा पाठलाग करताना आयरिसर्च संघाचा डाव 18.4 षटकांत 122 धावांत आटोपला. आयरिसर्च संघाकडून अक्षय खोडेने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली.

तर, दुसऱ्या लढतीत ऍटॉससिंटेल संघाने टी कनेक्‍टिव्हिटी संघावर पाच गडी राखून मात केली. टी कनेक्‍टिव्हिटी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 161 धावा केल्या. ऍटॉससिंटेल संघाने विजयी लक्ष्य 5 गडींच्या मोबदल्यात 17.5 षटकांतच पूर्ण केले. यात अभिजित परिदाने 38 चेंडूंत 7 चौकार व 5 षटकारांसह 73, तर सौरभ मंजरामकरने 41 चेंडूंत 49 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक –

1) इंडियन बॅंक – 20 षटकांत 8 बाद 163 (सौरभकुमार 57, विजय के. 52, अशोक अय्यर 2-40, अभिषेकसिंग 1-28) वि. वि. आयरिसर्च – 18.4 षटकांत सर्वबाद 122 (अक्षय खोडे 40, अभिषेकसिंग 21, विश्वजित उधन 2-13, विजय के. 1-11).

2) टी कनेक्‍टिव्हिटी – 20 षटकांत 8 बाद 161 (अबिल अली 45, कौस्तव सर्मा 35, अमित बोधाने 23, यमनप्पा गड्डी 21,शिवराज पिसाळ 2-21, जय मेहता 1-32, संकेत त्रिवेदी 1-35, सौरभ मंजरामकर 1-22) पराभूत वि. ऍटॉससिंटेल – 17.5 षटकांत 5 बाद 162 (अभिजित परिदा 73, सौरभ मंजरामकर 49, अमित बोधाने 3-30).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.