बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने काही दिवसांपूर्वी आपल्या “शेरॉक्स’ या उपक्रमाची घोषणा केली होती. सामान्य लोकांसाठी एक सुरक्षित स्थान तयार करणे, जिथे प्रत्येकजण आपल्यातील जादू दाखविण्यासाठी प्रवृत्त करणार आहे.
यामुळे “टाइम्स 40 अंडर 40′ हे अशा लोकांना प्रोत्साहित आणि सन्मान करण्यासाठीचे व्यासपीठ ठरणार आहे.
जॅकलिन फर्नांडिस ही आपल्या वेंचर शेरॉक्ससाठी एंटरप्रेन्योरच्या “टाइम्स 40 अंडर 40’च्या यादीत स्थान मिळविलेली एकमात्र अभिनेत्री ठरली आहे. जॅकलिन ही शेरॉक्सच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनविण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू केलेला एक उपक्रम आहे.
तसेच या उपक्रमातून स्वतःमध्ये असलेली एक विशेष शक्ती जगासमोर आणण्यासाठी मदत करणार आहे. या समुदायाची उद्दीष्टे आश्चर्यकारक आणि योग्य आहेत. म्हणूनच या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळविण्यात यश आले आहे.
विशेष म्हणजे, जॅकलिन ही एकमेव अभिनेत्री आहे जी याचा एक भाग आहे आणि ती लोकांच्या हितासाठी काम करत असल्याने तिला हा बहुमान मिळाला आहे.
या यादीमध्ये शीर्ष 40 प्रतिभावान तरूण उद्योजक, नेते व नवोदितांचा सन्मान करण्यात येणार आहे. ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे आणि ज्यांनी समाजात बदल घडवून आणण्यासाठी खरोखर योगदान दिले आहे.