पुणे {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेज फॉर गर्ल्स, अँग्लो उर्दू बॉईज स्कूल, एम.सी.इ.एस. इंग्लिश मीडियम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले.आबेदा इनामदार ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल ९८.६३, कला शाखेचा १००, वाणिज्य शाखेचा निकाल ९८.५५ टक्के लागला. व्होकेशनल शाखेचा निकाल ९५.५२ टक्के लागला.
विज्ञान शाखेतून ८४.८३ टक्के गुण मिळवून सारा अयाझ मेमन प्रथम आली. कला शाखेत ९४.६७ गुण मिळवून झोया मतीन खान प्रथम, तर कॉमर्स विभागात जसलीन कौर सतींदर सिंग पराशरने ९०.३३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. प्राचार्य रोशन आरा शेख यांनी त्यांचे अभिनंदन केले.
अँग्लो उर्दू बॉइज् स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा एकूण निकाल ९२.७९ लागला. विज्ञान शाखेचा ९६.०२ टक्के, वाणिज्य शाखेचा ९७.८२ टक्के, तर कला शाखेचा ५३.४४ टक्के निकाल लागला. मुख्याध्यापक राज मुजावर यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. जामदार जिब्रान जावेद हा विद्यार्थी ९४.१७ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आला. कॉमर्स विभागात पठाण मुसाब आरिफ हा विद्यार्थी ७९ टक्के मिळवून प्रथम आला, तर शेख हाफसा असगर ही विद्यार्थिनी ८०.३३ टक्के गुण मिळवून कला शाखेत प्रथम आली.
एम.सी.इ.एस. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९१. ८२ टक्के लागला. विज्ञान शाखेचा निकाल ९८.७१ टक्के लागला. कला शाखेचा निकाल ७२ टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल ९७.५० टक्के लागला. मेमन झारहान झाहीद हा विद्यार्थी ८०.३३ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आला.
कॉमर्स विभागात बांगी युसूफ काझी हा विद्यार्थी ८३.५० टक्के मिळवून प्रथम आला, तर शेख झोया झाकीर टक्के गुण मिळवून ७५.५ कला शाखेत प्रथम आली. मुख्याध्यापक सौ. अस्फिया अन्सारी यांनी अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ .पी ए इनामदार, उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सचिव प्रा. इरफान शेख यांनी तिन्ही विद्यालयांतील यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.