पुणे {प्रभात वृत्तसेवा} – सुस येथील चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या इयत्ता १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून उज्जवल यशाबरोबरच मागील २ वर्षांप्रमाणेच यंदाही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून आर्टस् कॉमर्स व सायन्स या तिन्ही क्षेत्रांत बाजी मारली आहे.
विज्ञान शाखेतून चंचल शर्माने ८६ टक्के गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले, तर अनुज शुक्ला याने ६८ टक्के गुण संपादन करून द्वितीय क्रमांक, नितेश सिंग याने ६७ टक्के गुण मिळवून तृतीय स्थान पटकावले. वाणिज्य या शाखेत जयश्री सद हिने ८० टक्के गुण मिळवत प्रथम स्थान प्राप्त केले, मोंटू परमार याने द्वितीय, तर आकाश पाटील याने तृतीय स्थान पटकावले. कला शाखेतून सचिन दिंडे याने ८३ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला.
शाळेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल यांचे मार्गदर्शन, पेरिविंकल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य निर्मल पंडित, डॉ. अभिजित टकले, प्रिया लड्डा व स्वाती कोल्हे यांचे नेतृत्व, तसेच विभागप्रमुख सचिन खोडके यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कल्याणी शेळके, पूनम पांढरे, नेहा माळवदे व इंदुमती पाटील या सर्वांच्या जिद्द व चिकामुळेच विद्यार्थ्यांना यश मिळविता आले.
सिल्वर क्रेस्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के
पुणे – झील एज्युकेशन सोसायटीच्या सिल्वर क्रेस्ट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा निकाल गतवर्षीप्रमाणे याही वर्षीही १०० टक्के लागला. वाणिज्य शाखेतून राधिका मराठे ९३ टक्के गुण मिळवून प्रथम आली असून, विज्ञान या शाखेतून अवंती सातपुते ९१ टक्के मिळून प्रथम आली.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कॉलेजचे संस्थापक एस. एम. काटकर, कार्यकारी सचिव जयेश काटकर, सल्लागार प्रदीप खांदवे, कॉलेजच्या प्राचार्या जयश्री देशमुख, सिल्वर क्रेस्ट स्कूलच्या प्राचार्या अनुजा येरुडकर यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन केले, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.