panadharpur temple : बलिप्रतिपदा पाडव्यानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मंदिरात मोसंबीने सुंदर आरास करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी पाच टन मोसंबीचा वापर करण्यात आला आहे. आज पाडव्यानिमित्त श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा सुंदर अशा भगव्या, हिरव्या रंगाच्या मोसंबीचा वापर करून सजवण्यात आला आहे.
दिवाळीनिमित्त लाडक्या विठ्ठलाची भेट घेण्यासाठी वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केली आहे. विठुरायाचंय गोजिरं रूप आपल्या डोळ्यांत साठवत आहे. आज दिवाळी पाडवा या निमित्तानं पंढरीत माऊलींच्या राऊळीला आकर्षक सजावट केली आहे.
दिवाळी पाडव्यानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या विठ्ठल भक्तानं सात हजार मोसंबी वापरून मंदिरात आकर्षक सजावट केली आहे. आज दिवाळी पाडव्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या वाघाली येथील आप्पासाहेब रामकृष्ण पाटील या विठ्ठल भक्तानं सजावट केली आहे.
सात हजार मोसंबी वापरून विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट केली आहे.विठ्ठल मंदिरात फुलं आणि फळांचा वापर होऊन कलात्मक पद्धतीनं विविध प्रकारची सजावट नेहमी केली जाते. यंदा आज पहिल्यांदाच विठ्ठल मंदिरात मोसंबीचा वापर करण्यात आला आहे.
मंदिराला केलेल्या सजावटीमुळे विठ्ठल मंदिराला मोसंबी बागेचे रुप आले आहे. दिवाळीनिमित्त लाडक्या विठ्ठलाची भेट घेण्यासाठी वारकऱ्यांनी पंढरीत गर्दी केली आहे.