MP Elections : मध्य प्रदेशमध्ये १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. उद्या संध्याकाळी राज्यात प्रचार पूर्णपणे थांबणार आहे. याआधी राज्यातील सर्वच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मंगळवारी निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक निकालांबाबत मोठे भाकीत केले.
#WATCH | Madhya Pradesh Elections | In Vidisha, Congress MP Rahul Gandhi says, “I have visited Madhya Pradesh several times now. I can tell cent per cent that there will be a ‘toofan’ of Congress party here. You can write it down, people of Madhya Pradesh are going to give… pic.twitter.com/c4Cvj9V8pV
— ANI (@ANI) November 14, 2023
राहुल गांधी यांनी विदिशा येथील जाहीर सभेला संबोधित करताना राज्यात पुढील सरकार काँग्रेस पक्षाचेच असेल, असा दावा केला. ते म्हणाले, ‘मी मध्य प्रदेशला खूप भेट दिली आहे. काँग्रेस पक्षाकडून येथे वादळ येणार आहे, असे मी शंभर टक्के म्हणू शकतो. तुम्ही लिहून ठेवा की मध्य प्रदेशातील जनता काँग्रेस पक्षाला 145 ते 150 जागा देणार आहे.
विदिशा रॅलीत ते म्हणाले की, ‘आम्ही द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडतो. आम्ही भाजपशी लढलो, कर्नाटकात आम्ही त्यांचा पराभव केला, हिमाचलमध्ये आम्ही त्यांचा पराभव केला. द्वेषाच्या बाजारात आपण प्रेमाचे दुकान उघडतो. आम्ही अहिंसेचे सैनिक आहोत, आम्ही मारत नाही… पण मध्यप्रदेशात आम्ही त्यांना प्रेमाने मारून हाकलून लावले’ असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.