Ramdas Athawale – पुणे परिसरातील 4 लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली. आता रिपाइंचे नेते रामदास आठवले ( Ramdas Athawale) यांनी यावर भाष्य केलं आहे. इंडिया आघाडी बिनकमी लढत आहे. राज्यात महाविकास आघाडी केवळ आरोप करत सुटली आहेत. आत्मे असतात. ते भटकत असतात. नरेंद्र मोदी गुजरातचे आहेत. दिल्लीत असले तरी त्यांचा आत्मा देशभर आहे. लोकशाही धोक्यात आहेत असं म्हणतात त्यांना माझ प्रश्न आहे, लोकशाही धोक्यात आली असती तर मोदी मत मागायला आले असते का? असे आठवले म्हणाले. रामदास आठवले यांनी या प्रकरणी त्यांच्या खास शैलीत एक कविता देखील केली आहे. नरेंद्र मोदींचा भटकत आहे महाराष्ट्रात आत्मा.. कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा…”, अशी कविता त्यांनी केली आहे. मला जरी तिकीट दिल नाही, तरी मी त्यांच्यासोबत – मला जरी तिकीट दिल नाही, तरी मी त्यांच्यासोबत आहे. मी राज्यसभेवर आहे. पण आम्हाला एकतरी जागा मिकावी अशी अपेक्षा होती. महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले असते. तर नक्की मिळाली असती. आपली राज्यसभा 2026 पर्यंत आहे त्यानंतर देखील मिळेल, असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, मी 17 राज्यांचा दौरा केला. देशातील वातावरण NDA बाजूने आहे. आमच्या उत्तर भारतात अनेक जागा निवडून येतील. आम्ही दिलेल्या घोषणेप्रमाणे 400 जागा जिंकू. जनतेचा कौल आम्हाला मान्य असेल. मोदींच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात 40 जागा आमच्या नक्की निवडून येतील. जे रोज म्हणत आहेत खोके-खोके, त्यांचे सरकले आहे डोके… – नरेंद्र मोदी यांचा आत्मा भटकत आहे. असं संजय राऊत म्हणतात, त्यांना उद्धव ठाकरे यांनी केवळ आरोप करण्यासाठी ठेवले आहे. राज्याचा खेळ खंडोबा यांनी केला आहे. जे रोज म्हणत आहेत खोके-खोके, त्यांचे सरकले आहे डोके…, असं म्हणत आठवलेंनी राऊतांच्या टीकेला उत्तर दिले.