माद्रिद – करीम बेन्झेमाने केलेल्या दोन अफलातून गोलमुळे रेयाल माद्रिदने व्हेलेन्सिया क्लबचा 3-0 असा पराभव केला आणि स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली.
बेन्झेमाने दोन गोल केले. मात्र, तिसरा गोल मार्को असेन्सिओने करत 10 महिन्यांनंतर जोशात पुनरागमन केले. त्या दुखापतीमुळे गेल्या मोसमातील अनेक स्पर्धांना मुकावे लागले होते. जवळपास 10 महिन्यांच्या खंडानंतर त्याने या सामन्याद्वारे पुनरागमन केले. बेन्झेमाने या सामन्यात सुरुवातीपासूनच वर्चस्व राखताना व्हेलेन्सियाच्या गोलकिपरला सुरेखरीत्या चकवून जे गोल केले त्याला खुद्द व्हेलेन्सियाच्या खेळाडूंनीही टाळ्या वाढवून दाद दिली.
ही स्पर्धा जिंकण्यासाठी रेयाल माद्रिद व बार्सिलोना यांच्यात गुणतालिकेत चुरस निर्माण झाली आहे. त्यात रेयालने हा सामना जिंकल्यामुळे आता या दोन्ही संघात होणारा सामना निर्णायक ठरणार आहे.