वंदना बर्वे
Sonia Gandhi angry over Rajasthan political crsis – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेली बंडखोरी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या जिव्हारी लागली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेहलोत काल मंगळवारपासून भेटीसाठी वेळ मागत आहेत. परंतु, सोनिया गांधी यांनी अद्याप वेळ दिलेली नाही, हे येथे उल्लेखनीय.
ठाकरे-शिंदेंच्या वादानंतर आता भगवानगडाच्या दसरा मेळाव्यावरून राजकारण! पंकजा मुंडेंपुढे पेच…
नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे गांधी कुटुंबाचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. एवढेच नव्हे तर, गांधी कुटुंबातील सर्वाधिक निष्ठावंतांमध्ये गेहलोत यांचे नाव अग्रभागी घेतले जाते. एवढ्या विश्वासू व्यक्तीने हायकमांडला डोळे दाखविले आहे. ही बाब सोनिया गांधी यांच्या मनाला लागली आहे. मुळात, सोनिया गांधी यांच्यासाठी हा धक्का राजकीय नसून वैयक्तिक स्वरूपाचा आहे, असे सूत्राचे म्हणणे आहे.
ठाकरे की शिंदे? महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी महिनाभर लांबणीवर! पुढील सुनावणी आता थेट…
अशात, कॉंग्रेस हायकमांड गेहलोत यांना क्षमा करून आणखी एक संधी देणार की नाही? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कारण, गेहलोत यांच्या अध्यक्षपदाचा मुद्दा निवडणुकीपुरता मर्यादित नसून याचा संबंध गुजरातमधील निवडणुकीशी सुद्धा आहे. गेहलोत हे गुजरातचे निवडणूक प्रभारी आहेत, हे येथे उल्लेखनीय.
दरम्यान, अशोक गेहलोत काल मंगळवारपासून सोनिया गांधी यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागत आहेत; परंतु त्यांना अद्याप वेळ देण्यात आलेली नाही. गेहलोत आज दुपारी सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी दिल्लीला येणार होते; परंतु हा दौरा त्यांनी टाळला असून आता रात्री आठ वाजता जयपूरहून दिल्लीकडे रवाना होणार असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, कॉंग्रेस हायकमांडने बोलाविल्यानंतर सचिन पायलट दिल्लीत दाखल झाले आहेत. ते दिल्लीत तंबू ठोकून आहेत. राजस्थानच्या बंडखोरीनंतर अशोक गेहलोत कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचे उमेदवार असतील की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ( Sonia Gandhi angry over Rajasthan political crsis )
महत्त्वाचे म्हणजे राहुल गांधी यांनी अध्यक्ष होण्यास शेवटचा नकार दिल्यानंतर गेहलोत यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास होकार दिला होता. यानंतर सोनिया गांधी यांनी गेहलोत यांना भेटीसाठी बोलाविले होते. उभय नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली. कॉंग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे? कुणाला कोणते पद द्यायचे आहे?
Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार? कमल नाथांनी स्पष्टच सांगितलं…
2024 मधील निवडणुकीसाठी काय करावे लागेल? अशा कितीतरी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून सोनिया गांधी यांनी आपले सर्व प्लॅनिंग गेहलोत यांच्याशी शेअर केले होते. एवढी गोपनीय माहिती शेअर केल्यानंतर गेहलोत यांनी बंडाचे निशाण फडकविले, ही बाब सोनिया गांधी यांच्या जिव्हारी लागली असल्याची माहिती सूत्राने दिली. ( Sonia Gandhi angry over Rajasthan political crsis )