Owaisi reaction on PFI Ban – आपण नेहमीच पीएफआय संघटनेच्या भुमिकेला विरोध करीत आलो आहेत परंतु त्या संघटनेवर बंदी घालण्याचा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्याचे समर्थन करता येणार नाही असे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की, मी नेहमीच पीएफआयच्या टोकाच्या आणि कट्टरपंथी दृष्टिकोनाला विरोध केला असून नेहमीच लोकशाही दृष्टिकोनाचे समर्थन केले आहे. पण पीएफआयवरील या बंदीचे समर्थन केले जाऊ शकत नाही कारण गुन्हेगारी करणाऱ्या काही व्यक्तींच्या कृतींचा अर्थ असा नाही की संस्थेवरच बंदी घातली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने देखील असे म्हटले आहे. एखाद्याला दोषी ठरवण्यासाठी केवळ संघटनेशी संबंध असणे पुरेसे नाही, असे त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
सरकारने उजव्या विचारसरणीच्या अन्य संघटनांवरही बंदी घालायला हवी असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. ज्या युएपीए कायद्या अंतर्गत ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे तो कायदा संविधानाच्या मुलभूत रचनेच्या विरोधात आहे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. ( Owaisi reaction on PFI Ban )