SC hearing on Maharashtra Political Crisis – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी महिनाभर लांबणीवर गेली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी आता 1 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या असल्याने सुनावणी महिनाभर पुढे ढकलल्याचे समजते. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुरु आहे. आता या सुनावणीची पुढची तारीख ही दिवाळीनंतर म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी आहे.
अनिल देशमुखांना दिलासा की धक्का? सुनावणी पूर्ण आता…
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यामध्ये न्यायालयाच्या कामकाजामध्ये अनेक सुट्ट्या आहेत. नवरात्रीची 9 दिवसांची सुट्टी आहे. तसेच, त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज पुढे ढकलण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मंगळवारी महत्त्वाची सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्षचिन्हावर निर्णय घेण्याची मुभा दिली. परंतु, अनेक मुद्द्यांवरची याचिका अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासंबंधी दहा मुद्द्यांवर सुनावणी होणार आहे.
Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार? कमल नाथांनी स्पष्टच सांगितलं…
मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला मोठा दिलासा देत उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला आहे. यामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आत्तापर्यंत “धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई निवडणूक आयोगासमोर पोहोचली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या कामकाजाला आता सर्वोच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. पण त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीसाठी एक महिन्याची वेळ लागणार आहे. त्यामुळे मधल्या काळात निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मात्र, यामुळे उद्धव ठाकरे गटाची अस्वस्थता वाढत चालल्याचे राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.