ICC Ranking : आयसीसीने नव्याने जाहीर केलेल्या टी-२० खेळाडू क्रमवारीत भारताच्या सूर्यकुमार यादवला ( Suryakumar Yadav ) मोठा फायदा झाला आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुध्द शेवटच्या सामन्यात खेळलेल्या महत्वाच्या खेळीमुळे तिसऱ्या स्थानावरून दुसरे स्थान गाठले आहे. तर पहिल्या स्थानावर पाकिस्तानचा मोहम्मद रिजवान ( Mohammad Rizwan ) कायम आहे. इंग्लड विरुध्द सुरु असलेल्या टी-२० मालिकेत रिजवान चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याने क्रमवारीतील ( ICC Ranking ) आपले पहिले स्थान आणखी घट्ट केले आहे.
या क्रमवारीत ( ICC Ranking ) तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आहे. बाबरने इंग्लंड विरुध्द दुसऱ्या टी-२० सामन्यात जोरदार शतक ठोकले होते. क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मार्कराम कायम आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार ऍरॉन फिंचला एका स्थानाचा फायदा झाला आहे.
याच नव्याने जाहीर झालेल्या क्रमवारीत ( ICC Ranking ) सर्वात जास्त फायदा इंग्लंडच्या हॅरी ब्रूक्स याला झाला आहे. त्याने तब्बल ११८ स्थानांची झेप घेत २९ वे स्थान गाठले आहे. ब्रूक्सने पाकिस्तान विरुध्द सुरु असलेल्या मालिकेत आपल्या फलंदाजीने सर्वांनाच भुरळ घातली आहे. ( ICC T20i ranking’s Suryakumar Yadav second place in men’s icc t20i ranking’s )
तसेच गोलंदाजी क्रमवारीत ( ICC Ranking ) पाकिस्तानच्या हॅरिस रौफला मोठा फायदा झाला आहे. तो ७ स्थानांची झेप घेत १४ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने इंग्लड विरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात दमदार गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत कांगारूंना आपल्या फिरकीच्या जाळ्यात जखडून ठेवणाऱ्या अक्षर पटेलला देखील या क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. तो १५ स्थानांची झेप घेत १८ व्या क्रमांकावर पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ऍडम झम्पा आणि भारताच्या भुवनेश्वर कुमारचे मात्र या क्रमवारीत नुकसान झाले आहे.