सोनाली बेंद्रेला कमबॅक करायचे आहे

कॅन्सरवर यशस्वी मात करणाऱ्या सोनाली बेंद्रेला आता सिनेसृष्टीमध्ये पुनरागमन करायचे आहे. आता काही वर्षांपासून सोनाली अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. पण तिने कॅमेऱ्यासमोर बऱ्यापैकी अनुभव मिळवला आहे. आता तिला आपल्या आरोग्याबरोबर अभिनयावरही लक्ष केंद्रीत करायचे आहे. अभिनय करण्याने आत्मविश्‍वास आणि सकारात्मक उर्जा मिळते, असा तिचा अनुभव आहे.

सध्या सिनेमाबरोबर, टिव्ही सिरीयल आणि वेबसिरीजचे माध्यमदेखील खूप सशक्‍त व्यासपीठ बनले आहे. त्यामध्येही काम करायला सोनालीला आवडेल. सध्या तरी कॉमेडी आणि हलक्‍या फुलक्‍या विषयांवरच्या सिनेमामध्ये काम करण्यास तिचे प्राधान्य असणार आहे. न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतल्यानंतर सोनाली सध्या वर्कआऊट आणि आरोग्यदायी आहाराद्वारे तब्येत टिकवण्याचा प्रयत्न करीत आहे.

2010 मध्ये ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’ मध्ये सोनालीने शेवटचा एक छोटा रोल करताना दिसली होती, त्यामध्ये सोनाक्षी अक्षय कुमार आणि इम्रान खान यांच्यासमवेत होती. आता उपचार घेऊन मायदेशी परत आलेल्या सोनालीला पुन्हा ऍक्‍टिव्ह होण्याची ईच्छा आहे. पण त्यासाठी चांगल्या बॅनरची तिला अपेक्षा आहे. पण तिच्याकडे अजून म्हणावा तशा प्रोजेक्‍टचा प्रस्ताव आलेला आही आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.