‘…तर उमेदवाराला कोणता माई का लाल हरवू शकत नाही’

मुंबई – राज्यातील सत्तास्थापनेची कोंडी कायम राहिल्याने मंगळवारी अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रवादीने तीन दिवसांची मुदतवाढ मिळण्यासाठी राज्यपालांना पत्र दिले होते. परंतु, राज्यपालांनी नकार देत राष्ट्रपती राजवटीची शिफारस पाठविली. राष्ट्रपतींनीही शिफारशींवर शिक्कामोर्तब केले. राष्ट्रपती राजवटीमुळे राजकीय वर्तुळात नाराजी व्यक्त करण्यात आली. अशातच भाजपचे सत्तास्थापन करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी माझ्या खांद्यावर टाकली आहे. राज्यपालांकडे १४५ आमदारांच्या पत्रासह राज्यपालांकडे जाऊ, असा दावा नारायण राणे यांनी केला होता.

राणेंच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात घोडेबाजार तेजीत येण्याची संकेत असल्याचे म्हंटले जात आहे. राणेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी नेते अजित पवार म्हणले कि, नारायण राणेंच्या दाव्याला किती गांभीर्याने घ्यायचं हा प्रश्न आहे. सध्याच्या काळात सगळे आमदार पक्षासोबत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच जर एखाद्या पक्षातील आमदार फुटला व त्याठिकाणी निवडणुका घ्याव्या लागल्या तर ज्या पक्षाचा आमदार फुटला त्याच पक्षाचा उमेदवार उभा राहील आणि अन्य दोन पक्ष त्याला पाठिंबा देतील. आणि असे झाले तर ३ पक्षाचा पाठिंबा असलेल्या उमेदवाराला कोणता माई का लाल हरवू शकत नाही, असेही अजित पवारांनी म्हंटले आहे.

राजीनामा देऊन जे निवडणुकीला सामोरे गेले त्यांचे काय झालं हे सगळ्यांना माहित आहे, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी लगावला. सत्तास्थापनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बोलणी सुरु आहे. पुढे सरकार कसं चालवायचं, कोणाची काय जबाबदारी असेल हे सगळं ठरवावं लागत आहे. त्यामुळे चर्चा सुरु आहे,या से अजित पवारांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.