खगरिया – बिहारमधील खगरिया जिल्ह्यात बुधवारी एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन अल्पवयीन मुलींसह एकूण तीन मुलींची कथितरित्या हत्या केली आणि नंतर गळफास लावून घेतल्याचा प्रकार घडला आहे. एखानिया गावात पहाटे दीड वाजता ही घटना घडली.
मुन्ना यादव असे या कुटुंब प्रमुखाचे नाव आहे.
त्याने आधी पत्नी पूजा देवी आणि नंतर त्याच्या तीन मुली सुमन (18), आंचल (16) आणि रोशनी कुमारी (15) यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याचा संशय आहे. त्यानंतर त्याने आपल्या दोन मुलांचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर यादव यांनी घराबाहेरील झाडाला गळफास लावून घेतला.
यादव यांच्या दोन्ही मुलांनी पोलिसांना माहिती दिली.घटनेचे नेमके कारण कळू शकलेले नाही. पोलिस घटनेशी संबंधित सर्व माहिती गोळा करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आर्थिक कारणामुळे या कुटुंबात हा प्रकार झाल असावा असा कयास लावला जात आहे.