नवी दिल्ली – मध्यप्रदेशमध्ये काँग्रेस सरकारच्या अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर नाराज काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर कमलनाथ सरकारमधील २० मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे मध्यप्रदेशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येण्याची चिन्हे दिसत आहे.
याबाबत माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांना विचारले असता ते म्हणाले की, मध्य प्रदेशातील सध्याचे राजकीय संकट हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. मला यावर काहीही बोलायचे नाही. सरकार पाडण्यामध्ये आम्हाला अजिबात रस नाही हे मी पहिल्यादिवशीच बोललो आहे. मध्य प्रदेशात कुठल्याही एका पक्षाकडे पूर्ण बहुमत नसून, पाठिंब्याने हे सरकार उभे आहे, असे त्यांनी संगितले.
Shivraj Singh Chouhan, former #MadhyaPradesh CM: This is Congress’ internal matter and I would not like to comment on it. We had said on the first day that we are not interested in bringing down the government. pic.twitter.com/zZUjU2Qc2V
— ANI (@ANI) March 10, 2020
दरम्यान, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे सांगण्यात आले आहे.
Digvijaya Singh, Congress: We tried to contact Scindia Ji (Jyotiraditya Scindia) but it is being told that he is suffering from swine flu, so haven’t been able to speak to him. #MadhyaPradesh pic.twitter.com/y5Ab984gaq
— ANI (@ANI) March 9, 2020