नवी दिल्ली : कोरोना विषाणू प्रथमत: चिनमधील वुहानमध्ये आढळला. त्याचे नाव कोरोना व्हायरस डिसीस 2019 असे ठेवण्यात आले. को (CO) कोरोनासाठी, वि (VI) व्हायरससाठी आणि द (द) डिसीससाठी असे शब्द घेऊन त्याने नामकरण कोविद 19 असे करण्यात आले.
सार्सच्या विषाणूंच्या गटातीलच हा विषाणू आहे. साध्या तापाप्रमाणे याची लक्षणे आहेत.
कसा पसरतो
कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यास याची बाधा होते. बाधीत उभे असलेल्या जमीनीवरही हा विषाणू राहू शकतो. हा जमीनीवर कित्येक तास राहू शकतो. मात्र साध्या जंतूनाशकांनी तो मरतो.
कोरोनाची लक्षणे
ताप, खोकला आणि श्वास घेण्यास अडथळा येणे ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे आहेत. काही गंभीर आजारी रुग्णात न्युमोनीया किंवा श्वसनात अडथळे येऊ शकतात. क्वचित प्रसंगी प्राणही जाऊ शकतो.
साध्या तापाप्रमाणेच याची लक्षणे आहेत. त्यामुळे कोरोनाची बाधा झाली आहे की नाही यासाठी वैद्यकीय चाचणी आवश्यक आहे. सारखे हात धुवा. टिश्यू किंवा रूमालाने तोंड झाकल्याशिवाय खोकू अथवा शिंकू नका. ते टिश्यू पेपर बंद कचऱ्याच्या डब्यातच फेका. तापासाठी प्रतिबंधात्मक औषधे आहेत. त्याबाबत आपण जागरूक रहा.
वैद्यकीय मास्क वापरावा का?
जर कोरोनाची लक्षणे (खोकला आणि शिंका) आढळत असतील तर इतरांच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरा. जर तुम्हाला शिंका येत नसेल तर मास्क वापरण्याची गरज नाही. जर मास्क जीर्ण झाला असेल आणि वापरलेला असेल तर तर त्याची विल्हेवाट योग्य पध्दतीने लावा म्हणजे हा विषाणू आणखी पसरणार नाही. केवळ मास्कचा वापर हा संसर्ग थांबवण्यास पुरेसा नाही, हे लक्षात असू द्या. त्यामुळे सारखे हात धुणे, शिंका आणि खोकला येत असल्यास तोंड झाकून घ्या. ताप आणि तापासारखी लक्षणे असणाऱ्या लोकांशी निकटचा संपर्क टाळा.