Shivaji Rao Adha Rao Patil In NCP| शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज 26 मार्च रोजी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. महायुतीमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला होता.
अखेर परस्पर सहमतीने शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याच स्पष्ट झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाची चर्चा रंगली होती. अखेर आज आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
याबाबत आढळराव पाटील म्हणाले की, “माझा पक्ष प्रवेश हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यावेळी आमदार अतुल बेनके, आमदार चेतन तुपे, आमदार दिलीप मोहिते, मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालय येथे होणार आहे. यावेळी माझ्या उमेदवारीची अधिकृत घोषणा सभेत होणे अपेक्षित नाही. फक्त माझा पक्ष प्रवेश होणार आहे. ज्यावेळी दिल्लीतून ग्रीन सिंगल येईल त्यावेळी सर्व महायुतीच्या उमेदवारांची नावे समोर येतील.” Shivaji Rao Adha Rao Patil In NCP|
आजही आढळराव पाटील यांचा शिंदेंशी कुठलेही मतभेद नाहीत. पण महायुतीच्या वाटाघाटीत शिरूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेली, उमेदवारी मात्र आढळरावांना देण्याचं ठरलं. म्हणून मग एकनाथ शिंदेंनी एकाप्रकारे आपला उमेदवार निर्यात करण्याचं ठरवलं, आणि त्यामुळे आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात चार वाजता त्यांचा पक्ष प्रवेशाचा सोहळा होणार आहे. आढळराव पाटील यांच्यासोबत त्यांचे समर्थक देखील राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. Shivaji Rao Adha Rao Patil In NCP|
हेही वाचा: