मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानचा वध ज्या वाघनखांनी केला. तीच वाघनख भारताला परत मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ब्रिटन सरकारने ही नखं या महिन्याच्या शेवटी भारताच्या हवाली करणार असल्याचे म्हटले आहे. याविषयीची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लवकरच परत येणार आहे. शिवरायांची जगदंबा तलवार आणि वाघनखे ही लंडनमध्ये आहेत. ती महाराष्ट्रात परत यावीत याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहे. ब्रिटनने वाघनखे आपणास देण्यास मान्यता दिली असून, त्यासाठी ऑक्टोबर महिन्यात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार इंग्लंडला जाणार आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राला या संदर्भात अधिक माहिती देताना सुधीर मनुगंटीवार यांनी, ‘छत्रपती शिवाजी महाराजांची लंडनमध्ये असलेली वाघ नखे या वर्षीच महाराष्ट्रात येणार आहे. ब्रिटन सरकारकडून या संदर्भातील पत्र मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करणार आहे. लंडनमधील विक्टोरिया एंड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ही वाघनखं ठेवण्यात आली आहे. सगळ्या औपचारिकता वेळेत पूर्ण झाल्यास या डिसेंबरपूर्वीच वाघनखं महाराष्ट्रात आणली जाण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे ज्या दिवशी शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला त्यादिवशीच परत आणण्याच्या प्रयत्नात आहे. हिंदू तिथीनुसार आणण्याच्या प्रयत्नात आहे. तसेच इतर तारखांचा देखील विचार केला जात आहे. ग्रेगोरियन कँलेंडरनुसार अफजल खानाचा वध केल्याची तारीख 10 नोव्हेंबर आहे. हिंदू तिथीनुसार येणाऱ्या तारखांचा देखील विचर करण्यात येत असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला होता, ती वाघनखं ब्रिटनमधून परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार करार करणार आहे. ती वाघनखं सध्या ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अॅल्बर्ट संग्रहालयात आहेत. सर्व काही ठरल्याप्रमाणं घडलं तर या वर्षीच ही वाघनखं भारतात परत आणण्यात येतील, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.