PM Modi In Chandrapur| पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींची चंद्रपुरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी तब्बल 10 वर्षांनी मोदी चंद्रपुरात येणार आहेत. दुपारी ४ वाजता मोरवा विमानतळाजवळील भव्य पटांगणावर ही सभा होणार आहे. यासाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या सभेसाठी प्रशासनाकडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चंद्रपूर शहराजवळ मोरवा विमानतळाच्या अगदी बाजूला विस्तीर्ण 16 एकर परिसरात मोदींच्या सभेची तयारी केली जात आहे. दुपारी चार वाजता सभा होणार असून यावेळी सुमारे एक लाख लोक यावेत या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. PM Modi In Chandrapur|
आसपासच्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि भाजपचे समर्थक देखील या सभेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या रणातील मोदींची महाराष्ट्रातील ही पहिलीच जाहीर सभा संख्येच्या दृष्टीने परिणामकारक करण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. PM Modi In Chandrapur|
दरम्यान, चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होणार आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचा 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत पराभव झाला होता. काँग्रेसचे बाळू धानोरकर यांच्या विजयाने भाजपला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे आजच्या या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांवर हल्ला चढवण्याची शक्यता आहे .ते आज सभेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:
VIDEO: पंतप्रधान मोदींच्या ‘रोड शो’दरम्यान घडली दुर्घटना; अनेकजण जखमी