Lok Sabha Election 2024 । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी महाराष्ट्रातील नागपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील चंद्रपूरमधून निवडणूक लढणार आहे. तर अरुणाचल पश्चिम मतदारसंघातून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आपले नशीब आजमावत आहेत.
याशिवाय मोदी सरकारमधील मंत्री सर्बानंद सोनोवाल, जितेंद्र सिंह, भूपेन्द्र यादव, संजीव बालियान, अर्जुन राम मेघवाल आणि एल मुरुगन यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. तसेच माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब, त्रिपुरा आणि नबाम तुकी, अरुणाचल प्रदेश यांच्या जागेवरही आज मतदान होणार आहे.
हे वाचले का ?
देशात लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात ; पंतप्रधानांकडून खास मराठीतून आवाहन