Chandrapur Lok Sabha 2024| चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे. तर काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोकर यांच्या पत्नी व आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे तब्बल 54 वर्षानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने एका महिला उमेदवाराला संधी दिली आहे. या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व खासदार पुरुष निवडून आले आहेत. आजपर्यंत फार कमी महिला उमेदरवारांना येथून निवडणुक लढवण्याची संधी मिळाली.
चंद्रपूर लोकसभा मतदार संघात १९६४ आणि १९६७ या निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदा गोपिकाताई कन्नमवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. १९६४ मध्ये झालेली पोटनिवडणूक त्या जिंकल्या आणि या मतदार संघाच्या पहिल्या महिला उमेदवार होण्याचा मान त्यांना मिळाला. त्यानंतर काँग्रेसने १९६७ मध्ये पुन्हा गोपिका कन्नमवार यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.
मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तेव्हा गोपिका कन्नमवार यांची थेट लढत अपक्ष उमेदवार काका कौशिक यांच्यासोबत झाली होती. कौशिक यांना तेव्हा १ लाख ३९ हजार ३१० मते मिळाली होती. तर काँग्रेसच्या गोपिका कन्नमवार यांना १ लाख २२ हजार ४७४ मते मिळाली होती. Chandrapur Lok Sabha 2024|
त्यानंतर ५४ वर्षांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या रुपाने एका महिलेला संधी दिली आहे. आमदार धानोरकर या काँग्रेसचे दिवंगत खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर यंदाच्या चंद्रपूरमधून लोकसभा निवडणुकीसाठी प्रतिभा धानोकर यांना संधी देण्यात आली आहे. Chandrapur Lok Sabha 2024|
दरम्यान, चंद्रपूरमधून आमदार म्हणून या जिल्ह्यात माजी मंत्री यशोधरा बजाज, माजी मंत्री शोभाताई फडणवीस आणि आमदार प्रतिभा धानोरकर या महिला निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे आता काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोकर चंद्रपुरात नवा इतिहास घडवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा:
एलॉन मस्कचा मोठा निर्णय; भारतातील 2 लाखांहून अधिक ‘एक्स’ खाती बंद; काय आहे यामागचं कारण ?